येत्या काही महिन्यांत दक्षिण भारतातील तामिळनाडू,केरळ आणि पुद्दुचेरी तसेच पूर्वेकडील आसाम आणि बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी बंगाल आणि तामिळनाडूवर सर्वांच्या नजरा सर्वाधिक खिळल्या आहेत. याचे एक मोठे कारण म्हणजे दोन्ही राज्यांत नवीन राजकीय पक्षांनी प्रवेश केला आहे. काही लोकांचे असे मत आहे की हे नवीन पक्ष प्रस्थापित पक्षांना आव्हान देऊ शकतात आणि युती-आघाडीच्या शक्यतांवर परिणाम करून राजकीय गणित बिघडू शकतात, तर इतरांचे मत आहे की, हे पक्ष केवळ चर्चेचाविषय ठरतील, पण राजकीयदृष्ट्या त्यांना फारसे महत्त्व नसेल. याच निमित्ताने अलीकडच्या निवडणुकांमधील नवीन पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकणे गरजेचे आहे. बंगालमध्ये टीएमसीमधून निलंबित झालेले आणि मुर्शिदाबादच्या भरतपूर जागेचे आमदार हुमायूं कबीरयांनी ‘जनता उन्नयन पार्टी’ या नवीन पक्षाची घोषणाकेली आहे. हा पक्ष इंडियन सेक्युलर फ्रंट आणि एआयएमआयएमसोबत युतीची शक्यता शोधत असून त्यामुळे टीएमसीच्या मुस्लिम व्होट बँकेवर परिणामहोऊ शकतो. तामिळनाडूमध्ये चित्रपट अभिनेता विजययांनी आपल्या ‘तमिझगा वेत्री कषगम’ या राजकीयपक्षाची घोषणा केली आहे. विजय यांनी आपला पक्षभ्रष्टाचार व जातीयवादविरोधी तसेच सामाजिक न्यायआणि तामिळ स्वाभिमान या परंपरांवर आधारितअसल्याचे सांगितले आहे. 2026 ची विधानसभानिवडणूक लढवणे आणि जिंकणे हे त्यांच्या पक्षाचेमुख्य उद्दिष्ट असून त्यांनी आपला पक्ष डीएमके आणिभाजप या दोन्ही गटांसमोर द्रविडी संस्कृतीची एक नवीनराजकीय ताकद म्हणून उभा केला आहे. केरळमध्ये मॅथ्यूटी. थॉमस यांनी जानेवारीत जेडीएसमधून बाहेर पडून‘इंडियन सोशालिस्ट जनता दल’ स्थापन केला आहे, तरयाच राज्यात काँग्रेसचे माजी नेते जॉर्ज जे. मॅथ्यू यांनीशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी‘नॅशनल फार्मर्स पार्टी’ स्थापन केली आहे. भारतातील निवडणुकांमध्ये नवीन राजकीय पक्षांच्याभविष्याबद्दल आत्मविश्वासाने काहीही सांगणे कठीणआहे. कारण भूतकाळात आपण अशा नवीन पक्षांच्यायशाच्या आणि अपयशाच्या दोन्ही कथा पाहिल्याआहेत. 2015 आणि 2020 मध्ये आम आदमी पार्टीनेदिल्लीत मोठा विजय मिळवला, पण 2025 मध्ये तीसत्तेबाहेर गेली, 2022 मध्ये पंजाबमध्ये त्यांनी मोठे यशमिळवले होते. मात्र सर्वच नवीन पक्षांचे नशीब असेनसते. 2025 च्या बिहार निवडणुकीत प्रशांत किशोरयांच्या जन सुराज पार्टीची खूप चर्चा झाली, पण केवळ3 टक्के मते मिळवून त्यांना खातेही उघडता आले नाही.2006 मध्ये स्थापन झालेला राज ठाकरे यांचा मनसे पक्ष2009 च्या महाराष्ट्र निवडणुकीत पहिल्यांदा 143 जागांवरलढला आणि 13 जागा जिंकल्याही, पण नंतरच्यानिवडणुकांमध्ये त्यांची कामगिरी खालावत गेली. आसाममध्ये 2015 मध्ये प्रमोद बोडो यांनी स्थापनकेलेल्या ‘युनायटेड पीपुल्स पार्टी लिबरल’नेबोडोलँडमधील समावेशक कल्याणावर लक्ष केंद्रितकेले आणि 2021 च्या निवडणुकीत 8 पैकी 6 जागाजिंकून ते सत्ताधारी आघाडीचे महत्त्वाचे घटक बनले.2014 मध्ये स्थापन झालेल्या पवन कल्याण यांच्याजनसेना पार्टीने 2024 च्या निवडणुकीतटीडीपी-भाजपसोबत युती करून 21 जागा लढवल्याआणि सर्वच्या सर्व जागा जिंकल्या, ज्यामुळे एनडीएच्याएकूण मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली. रामविलासपासवान यांच्या लोजपाने 2005 मध्ये बिहारमध्ये काँग्रेसआणि राजदसोबत युती करून 203 जागा लढवल्याहोत्या आणि 29 जागा जिंकल्या होत्या. भारतीयराजकारणातील नवीन पक्षांच्या कामगिरीमधील हीविविधता पाहता, निवडणुकांमध्ये नवीन पक्ष नक्कीकशी कामगिरी करतील, याचे कोणतेही निश्चित सूत्रसापडणे कठीण आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पक्ष स्थापन करून त्याला गती देण्यासाठी‘नेतृत्व’ हा महत्त्वाचा घटक असतो.तथापि, त्यापेक्षाही महत्त्वाची असते तीपक्ष संघटना व संरचना. पक्ष नवा असो वाजुना, त्याच्या निवडणूक यशाचे दोनचमुख्य स्तंभ असतात – नेतृत्व व संघटन.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : दहावीचा गणिताचा पेपर फुटला? विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार! तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर व्हायरल.
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:विचार अन् वीरता जीवनात दोन्ही टिकवून ठेवली पाहिजे
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:ट्रम्पच्या चिथावणीस बळी न पडणे हीच समजदारी
- प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादाप्रतिकार सामील असायला हवा
महाराष्ट्र
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:ट्रम्पच्या चिथावणीस बळी न पडणे हीच समजदारी
- प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादाप्रतिकार सामील असायला हवा
- मेघना पंत यांचा कॉलम:आज जगभरातील महिलांचे अधिकार एकमेकांशी जोडले गेले आहेत
- एन. रघुरामन यांचा कॉलम:‘क्विक सर्व्हिस’ एक व्यसन आहे, जे रिटेलर्स मोफत देऊन सवय लावत आहेत
गुन्हा
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:ट्रम्पच्या चिथावणीस बळी न पडणे हीच समजदारी
- प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादाप्रतिकार सामील असायला हवा
- मेघना पंत यांचा कॉलम:आज जगभरातील महिलांचे अधिकार एकमेकांशी जोडले गेले आहेत
- एन. रघुरामन यांचा कॉलम:‘क्विक सर्व्हिस’ एक व्यसन आहे, जे रिटेलर्स मोफत देऊन सवय लावत आहेत
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- Health त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Pune ; पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसकडून 'या' चेहऱ्यांना संधी
- Pune - पुणे विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई; बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून ८ कोटींचे ड्रग्ज जप्त
- उन्हाळ्यात घामामुळे मेकअप उतरतो? दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'या' सोप्या युक्त्या वापरा.
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार






















Subscribe to my channel


