मेघना पंत यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎आज जगभरातील महिलांचे अधिकार एकमेकांशी जोडले गेले आहेत‎

युद्धे क्वचितच कधी आपल्या सीमांच्या आत मर्यादित‎ राहतात. ती शक्ती, स्वातंत्र्य आणि महिलांच्या ‎अधिकारांबाबतच्या जागतिक चर्चेलाही बदलून टाकतात.‎इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष भारतातील महिलांसाठी ‎केवळ दूरची बातमी असू शकत नाही- तर तो एक‎आरसा आहे, एक इशारा आहे आणि अनेक अर्थांनी‎सजग राहण्याचे आवाहनही आहे.‎ इराणमध्ये महिला अनेक दशकांपासून सार्वजनिक‎जीवनातील पेहराव आणि वर्तणुकीशी संबंधित कठोर‎नियमांसह जगत आहेत. तिथले सरकार महिलांसाठी‎हिजाब घालण्याची सक्ती करते आणि दैनंदिन जीवनात‎त्यांच्यावर अनेक बंधने लादते. या नियमांविरुद्ध आवाज‎उठवणाऱ्या महिलांना अनेकदा शिक्षा, अटक किंवा‎छळाला सामोरे जावे लागते. राजकीय तणाव किंवा‎युद्धाच्या काळात तर सरकारे नियंत्रण अधिकच कडक‎करतात. अशा परिस्थितीत महिलांचे स्वातंत्र्य वेगाने‎आकुंचन पावते.‎ अलीकडच्या काही वर्षांत इराणमध्ये महिलांनी कठोर‎कायद्यांविरुद्ध मोठ्या संख्येने निदर्शने केली. त्यांचे हे‎आंदोलन जगभर “वुमन, लाइफ, फ्रीडम” या नावाने‎ओळखले गेले. जागतिक स्तरावर याची चर्चा झाली.‎महिला रस्त्यावर उतरल्या, आपली मते उघडपणे मांडली‎आणि निषेध म्हणून हिजाब उतरवून फेकला. त्यापैकी‎अनेकींनी विलक्षण धैर्य दाखवले, जरी त्यांना यात‎असलेल्या धोक्यांची पूर्ण कल्पना होती. अनेक महिलांना‎अटक करण्यात आली, काहींना धमक्या मिळाल्या,‎काहींना देश सोडावा लागला आणि काहींना केवळ‎स्वातंत्र्याची मागणी केल्याने आपला जीवही गमवावा‎लागला. भारतातील महिलांना या घटना धक्कादायक‎वाटू शकतात. आपण एका लोकशाही देशात राहतो,‎जिथे महिलांना अनेक कायदेशीर अधिकार प्राप्त आहेत.‎महिला मतदान करतात, काम करतात, व्यवसाय‎चालवतात, राजकारणात येतात आणि सोशल मीडियावर‎आपली मते मोकळेपणाने मांडतात. इतर अनेक देशांच्या‎तुलनेत भारतीय महिलांना अधिक स्वातंत्र्य आहे.‎ पण याचा अर्थ असा नाही की संघर्ष संपला आहे.‎भारतात आजही बलात्कार, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी,‎स्त्रीभ्रूणहत्या, वेतनातील असमानता आणि महिलांच्या‎निवडीवर येणारा सामाजिक दबाव यांसारख्या समस्या‎अस्तित्वात आहेत. अनेक महिला आजही आर्थिक‎स्वातंत्र्य, सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा आणि घर तसेच‎कामाच्या ठिकाणी समान आदरासाठी लढा देत आहेत.‎अशा वेळी प्रश्न पडतो की, आपण कोणत्या स्वातंत्र्याला‎गृहीत धरून चाललो आहोत? जर संस्था कमकुवत‎झाल्या, तर 1979 नंतर इराणमध्ये झाले तसे हे अधिकार‎किती लवकर हिरावले जाऊ शकतात? आणि‎सीमांपलीकडची ही एकजूट लैंगिक समानतेच्या‎लढ्याला कशी मजबूत करू शकते?‎ सत्य हे आहे की, आज जगभरातील महिलांचे‎अधिकार एकमेकांशी अधिक जोडले जात आहेत.‎सोशल मीडिया, स्थलांतर आणि जागतिक सक्रियतेमुळे‎तेहरानमध्ये उठणारा आवाज दिल्ली आणि मुंबईपर्यंत‎घुमतो. जेव्हा इराणी महिला निषेध म्हणून आपला हिजाब‎उतरवण्यासाठी जीव धोक्यात घालतात, तेव्हा त्या केवळ‎आपल्या सरकारलाच आव्हान देत नसतात; तर त्या‎स्वातंत्र्याच्या जागतिक कल्पनेचाही विस्तार करत‎असतात. हे आपल्याला याचीही आठवण करून देते‎की, महिलांचे अधिकार किती नाजूक किंवा असुरक्षित‎असू शकतात- म्हणजेच आज जे स्वातंत्र्य उपलब्ध‎आहे, ते समाज त्याची रक्षा करायचे थांबला तर उद्या‎नाहीसेही होऊ शकते.‎ भारतीय महिलांसाठी धडा हाच आहे की, जागरूक‎बना आणि आपल्या अधिकारांना कधीही गृहीत धरू‎नका. मजबूत कायदे, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि‎सामाजिक सहकार्याच्या माध्यमातून हे अधिकार सतत‎सुरक्षित ठेवावे लागतात.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *