टी-२० विश्वचषकानंतर आयसीसी क्रमवारीत भारतीयांचा वरचष्मा; अभिषेक अव्वल, संजू सॅमसनची १८ स्थानांची उसळी.

image

पाकिस्तानचा साहिबजादाचं स्थान धोक्यात

पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याची रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झाली आहे. तो तिसऱ्या स्थानी घसरला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट्स ८४८ आहे. इंग्लंडच्या फिल साल्टचीही एका स्थानाची घसरण झाली आहे. ७९२ रेटिंगसह तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेचा पथुम निसंका हा पाचव्या स्थानी आहे.

न्यूझीलंडचा टीम सिफर्ट यानं जबरदस्त झेप घेतली आहे. चार स्थानांनी झेपावत तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा तिलक वर्मा याची एका स्थानानं घसरण झालीय. तो सातव्या स्थानी, तर दक्षिण आफ्रिकेचा ब्रेविस आठव्या स्थानी आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे दोन स्थानांचे नुकसान झाले असून, तो नवव्या स्थानी घसरला आहे. तर इंग्लंडचा बटलर ७१६ रेटिंगसह दहाव्या स्थानी आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *