Parola Accident : लग्न घरात दुःखाचा डोंगर; दोन कारच्या समोरासमोर धडकेत पती-पत्नीचा मृत्य, ४ जण जखमी

Parola Accident : दोन दिवसांनी भावाच्या मुलीचे लग्न असल्याने या सोहळ्यासाठी गावी येणाऱ्या पती- पत्नीवर काळाने घाला घातला आहे. काही अंतरावर गाव आले असताना म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत.

पारोळा (Parola) तालुक्यातील म्हसवे फाटा येथे हा भीषण अपघात (Accident) झाला असून अपघातात लोणी बुद्रुक (ता. पारोळा) येथील रहिवासी सुधीर देवीदास पाटील (वय ४५) व ज्योती सुधीर पाटील (वय ४०) या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. सुधीर पाटील हे सुरतला किराणा मालाचे व्यापार करायचे. ४ डिसेंबरला आपल्या मूळगावी लोणी बुद्रुक (ता. पारोळा) येथे चुलत भावाच्या मुलीचा विवाह असल्याने दोन दिवस अगोदर ते गावी येण्यासाठी निघाले होते.

Cidco Lottery : सिडकोचा मोठा निर्णय! घरासाठी अर्ज करण्याच्या दोन अटी शिथिल

वळण रस्त्यावर कारची धडक

दरम्यान २ डिसेंबरला सकाळी सुरत येथून गावी येण्यासाठी निघाले. गाव काही अंतरावर असतानाच दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांची कार लोणी बुद्रुक गावाच्या दिशेने म्हसवे फाट्याजवळ वळण घेत असताना जळगावकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. त्यात सुधीर व ज्योती पाटील जागीच ठार झाले.

चारजण गंभीर जखमी

दरम्यान दुसऱ्या कारमधील नाशिक येथील शिरीष लठ्ठा (वय ४०), उमेश लाने (वय ४२), कारचालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply