Weather Update : सावधान! कडाक्याच्या थंडीत होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला अलर्ट

Weather Update : मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळले असा, इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होणार असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत थंडीचा जोर कमी होणार असून पाऊस  कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील तापमान देखील २ ते ३ अंशांनी घसरेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक थंडी?

हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात थंडीचा कालावधी कमी आहे. पण तरी देखील मुंबई, कोकण, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि नगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी ५ दिवसांचा कालावधी लागणारे आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी ते २५ जानेवारी या दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामध्ये उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचाही समावेश आहे. तसेच इतकंच नाहीतर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमध्येही हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply