Uttar Pradesh News : दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश; आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एजंटला अटक

Uttar Pradesh News : रशियात राहून आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका भारतीय तरुणाला उत्तरप्रदेश एटीएसने रविवारी (४ फेब्रुवारी) अटक केली आहे. सत्येंद्र सिवाल असं या संशयित हेराचं नाव आहे. सत्येंद्र हा मूळ हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो मॉस्को येथील भारतीय दूतावासात कार्यरत होता. त्याच्यावर आयएसआयसाठी काम करत असल्याचा आरोप आहे.

सत्येंद्र याने आपला गुन्हा कबुल केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हँडलर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या तरुणांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून हेरगिरी करून घेत असल्याची माहिती यूपी एटीएसला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती.

Ram Mandir News : राम मंदिरावर हल्ला होणार असल्याचा मुंबई पोलीस कंट्रोल रुमला फोन, सर्व यंत्रणा सतर्क

माहिती मिळताच एसटीएसचे पथक सतर्क झाले. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तपासात असे समोर आले की, सत्येंद्र सिवाल हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात असून तो हँडलरला महत्त्वाची माहिती पुरवत आहे.

पुरावे मिळताच एटीएसने सत्येंद्र याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र 2021 पासून रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात IBSA (भारत आधारित सुरक्षा सहाय्यक) म्हणून काम करत होता.

काम करताना तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या संपर्कात आला. आयएसआयच्या हँडलरने त्याला पैशांचे अमिष दाखवून त्याच्याकडून काही महत्वाची माहिती मिळवली. दरम्यान, सत्येंद्र याने आयएसआयला नेमकी कोणती माहिती पुरवली याचा तपास एटीएस करत आहे. आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply