Sushma Andhare : नारायण राणे मानसिकरित्या आजारी, उपचार घेऊन लवकर बरे व्हावे; सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

Sushma Andhare : नारायण राणे हे मानसिक आजारी आहेत. आजारी माणस तापात बडबडतात. त्यामुळे त्यांचा बोलणं मनावर घेऊ नये. माझ्या भाच्यानी देखील प्रचारातून थोडा वेळ काढून नारायण राणेंना एका चांगल्या डॉक्टरांना उपचारासाठी दाखवावं. तापात माणसं बडबडतात. त्या आजारात नारायण राणे यांच्या मेंदूवर देखील परिणाम झालेला असू शकतो; असा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.  

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे  हे वेडा आणि सायकीक केस आहे. आमच्या सुपाऱ्या दहशतवाद्याना देत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी देहूरोडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. दरम्यान अंधारे यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने धम्मभूमी बुद्ध विहारात जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Sushma Andhare News : नारायण राणे मानसिकरित्या आजारी, उपचार घेऊन लवकर बरे व्हावे; सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

जितना बडा भ्रष्टाचार उतनी बडी भाजपा मे ग्रँड एन्ट्री ही मोदी की गॅरंटी आहे. आज भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि  शिवसेना यातल्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजपने कचरा आपल्याकडे डम्प केला ही मोदींची गॅरंटी आहे. आज मोदींनी वन नेशन वन इलेक्शन म्हणत उघड उघड संविधान बदलण्याची भाषा केली आहे. आज जनता बाबासाहेबांच्या जन्मदिनी प्रण करतील की बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना क्षमा करणार नाही. भाजपने खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे करू नये. मागच्या वेळी दिलेल्या संकल्प पत्रात केलेल्या घोषणांचे काय झाले, यावर पहिले बोलावं अस वक्तव्य शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे..

प्रत्येक पक्षाला युती करायची की नाही याचा अधिकार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. तो आजही आहे. आंबेडकरांनी ते घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. उगाच हा पक्ष A टीम तो पक्ष B टीम करण्यापेक्षा आमचा पक्ष या सर्व स्पर्धेत कसा अव्वल राहील याकडे आमचं लक्ष जास्त आहे. भाजपचा आजचा जाहीरनामा हा भाजप विरोधी आहे की संविधानाला मानणारा मतदार कधीही विभाजन करून भाजपला त्याचा फायदा होईल असं करणार नाही; असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply