Shiv Jayanti : “राजनीतीधुरंधर, सिंहासनाधीश्वर…”, शिवनेरीवर बाल शिवरायाच्या आगमनाचा उत्साह, घोषणांनी निनादला आसमंत!

Shiv Jayanti : छत्रपती शिवरायांच्या ३९४व्या जयंतीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात उत्सवाचं वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. आपल्या लाडक्या राजाच्या जन्मसोहळ्यासाठी शिवप्रेमी मावळ्यांनी किल्ले शिवनेरी सजवला होता. यावेळी पोलीस खात्याकडून सलामीही देण्यात आली.

शिवजयंतीच्या निमित्ताने यावेळी शिवनेरीवरच्या पाळणाघरात महिलांनी पाळणागीत गायलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी शिवनेरीवर गर्दी केली होती. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन शिवनेरीवर करण्यात आलं असून यात लहान मुलांनी छत्रपतींचा जीवनपट मांडणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही मुलांनी साहसी खेळांची प्रात्याक्षिकेही सादर केली.

CM Eknath Shinde : शिवजयंती निमित्ताने मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची माहिती; म्हणाले, उद्याच...

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या जन्मोत्सात सहभागी होता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले होते. यावेळी संभाव्य गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण खरदारी घेण्यात आली होती. शिवनेरीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply