Satara News : साताऱ्यातील पाटण तालुक्यात गोळीबार, घटनेत २ ठार; परिसरात खळबळ

सातारा : साताऱ्यातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील पाटण तालुक्यात गोळीबाराची मोठी घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा भागात ही गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण ठार आणि एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेतील जखमी व्यक्तीवर कराड येथे उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.

पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पाटण पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संशयित मदन कदम यांना ताब्यात घेतला आहे. संशयित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. मदन कदम यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटोही समोर आला आहे.

रविवारी रात्री झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार नेमका कोणी केला, कशासाठी केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply