Satara : दूषित पाण्‍यासह संथ वाहते कृष्णा, वेण्‍णामाई; पालिकेकडून प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी संथगतीने

Satara : वाहत्‍या पाण्‍याबरोबरच आजूबाजूचा काठ समृद्ध करणाऱ्या नद्या, वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण व इतर कारणांमुळे त्‍या दिवसेंदिवस प्रदूषित होत आहेत. वाढत्‍या प्रदूषणामुळे कृष्णा, वेण्णा नदीपात्रांना गटारांचे स्वरूप आले असून, तेच पाणी शुद्धीकरणानंतर शहराच्‍या पूर्वभागास प्राधिकरणाच्‍या वतीने वर्षानुवर्षे पुरविण्‍यात येत आहे.

शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी सातारा पालिका प्रकल्‍प उभारत असली, तरी त्याची उभारणी संथगतीने सुरू आहे. बदल्‍या काळानुरूप वाढणारी, विस्‍तारणारी गावे, शहरे, वाढलेले औद्योगिकीकरण व उभे राहिलेल्‍या कारखानदारीमुळे मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या नद्यांचे जलचक्र धोक्‍यात येत चालले आहे.

अजिंक्‍यतारा, यवतेश्‍‍वर आणि पेढ्याचा भैरोबा डोंगराच्या पायथ्‍याशी वसलेल्‍या साताऱ्यातून डोंगररांगातून आलेले नैसर्गिक ओढे आणि नाले वाहतात. या ओढ्यानाल्‍यांमध्‍येच नागरीवस्‍तीतील सांडपाणी पूर्वापार वाहून जात आहे.

PM Modi In Shirdi : 'सबका मालिक एक' प्रमाणेच मोदींचा 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र- अजित पवार

 

कालांतराने वस्‍ती वाढली आणि ओढेनाल्‍यांत सांडपाणी मिसळण्‍याच्‍या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओढ्यानाल्‍यांतील हे सांडपाणी थेट वाहून जात वेण्‍णा नदीत जाऊन मिसळते. या पाण्‍यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्‍याने परिणामी वेण्‍णा आणि कृष्णा नदीतील जलचक्र धोक्‍यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार राजरोस सुरू असून, जलप्रदूषण रोखण्‍यासाठीच्‍या कोणत्‍याही ठोस उपाययोजना पालिका, तसेच इतर यंत्रणांकडून राबविण्‍यात आलेल्‍या नाहीत.

अलीकडेच पालिकेने संपूर्ण शहरातील गटारे बंदिस्‍त केली असून, ओढ्यानाल्‍यांचे रुंदी, अस्‍तरीकरण हाती घेतले आहे. या कामादरम्‍यान सांडपाण्‍यावर विकेंद्रितपणे प्रक्रिया करण्‍यासाठी पालिकेने प्रकल्‍प उभारण्‍याचे ठरवले आहे. मात्र, जागा व इतर तांत्रिक कारणास्‍तव त्‍याचे काम रखडल्‍याने सांडपाणी थेट नदीत जाऊन मिसळण्‍याच्‍या प्रमाणात वाढच होत आहे.

सातारा शहरातून नदीपात्रात मिसळल्‍या जाणाऱ्या पाण्‍यावर सद्यःस्‍थितीत प्रक्रिया होत नाही. याबाबत आम्‍ही पालिकेस सूचना केल्‍या असून, यापूर्वी न्‍यायालयीन कारवाईही करण्‍यात आली आहे. सध्‍या पालिका सांडपाण्‍यावर प्रक्रिया करण्‍यासाठीचा एक प्रकल्‍प उभारत आहे. यापैकी ५ एमएलडी इतक्‍या क्षमतेच्‍या एका संयंत्राची उभारणी सुरू आहे. पालिकेच्‍या वतीने १८ एमएलडी इतक्‍या पाण्‍यावर प्रक्रिया होणे आवश्‍‍यक आहे.

या भागात होतो पाणीपुरवठा...

वेण्‍णा आणि कृष्‍णा नदीच्‍या संगमाखालील भागात जीवन प्राधिकरणाची उपसा विहीर आहे. याठिकाणी उपसा केलेल्‍या पाण्‍यावर कृष्‍णानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्‍यात येते. येथून हे पाणी शहराच्‍या पूर्वभागातील सदरबझार, समर्थनगर, विलासपूर, संभाजीनगर, गोडोलीसह इतर भागांना पुरविण्‍यात येते.

दूरगामी परिणाम होणार...

नदीतील पाणी उपसल्‍यानंतर त्‍यावर शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रसायने व इतर घटकांचा वापर करावा लागतो. त्‍या रसायने, घटकांचा शीघ्ररूपी मानवी जीवनावर परिणाम होत नसला, तरी दूरगामी परिणाम होण्‍याची दाट शक्‍यता आहे. हे टाळण्‍यासाठी, तसेच नदीतील जलचक्र, पर्यावरण कायम राखण्‍यासाठीच्‍या उपाययेाजना सातारा पालिकेसह प्रदूषण महामंडळाने तातडीने राबवणे आवश्‍‍यक आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply