Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंचे पाय खोलात, परळीनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल, धनंजय मुंडेंवरील वक्तव्य भोवलं

 

FIR Filed Against Manoj Jarange Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणी येथे केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परळीनंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आधी ओबीसी बांधवांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या केल्यानंतर त्या ठिकाणी देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. परभणी येथील मोर्चात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भाषणे करण्यात आली.. या विरोधात तात्काळ कारवाई करावी व गुन्हा दाखल करावा, अशीच मागणी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील,अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बीडमधील ओबीसी समाज बांधव तसेच मुंडे समर्थक हे काल दुपारी दोन वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिया आंदोलनात पुरुषांबरोबर बरोबर महिला देखील सामील झाल्या होत्या. अखेर पहाटे 3 वाजता मनोज जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आंदोलकांसोबत गुणरत्न सदावर्ते, लक्ष्मण हाके यांनी फोनवरून त्यांच्याशी साधला संवाद साधला.

HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा; तरीही अशी घ्या काळजी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे बीडमधील मुंडे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतली. परळीमध्ये दुपारी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या केले होते. त्यानंतर दुपारी बीडमध्येही मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, त्यासाठी आंदोलन करण्यात आलेय. ठाणे पोलीस स्टेशनमध्ये दुपारी २ पासून ठिय्या सुरू होता. पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजता गुन्हा दाखल करून घेतला. आंदोलनकर्त्यांसोबत लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांनी फोनवरून चर्चा केली.

परभणीमध्ये केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर परळीसह बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी येथे झालेल्या मोर्चात सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी भाषणे करण्यात आली असल्याचा आरोप आहे. मोर्चादरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केल्याने, बीडमधील मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply