Republic Day 2023 : तिन्ही दलाच्या सैनिकांकडून दिली जाते वेगवेगळ्या प्रकारची सलामी; जाणून घ्या कारण

आज देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन. यावेळी तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून आणि सैनिकांकडून मानवंदना दिली जाते. राष्ट्रपती आणि भारतीय ध्वजाचा मान राखण्यासाठी सलाम केला जातो पण तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून केली जाणारी सलामी वेगवेगळी असते. तिनही दलांकडून वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येणाऱ्या सलामीचा अर्थ जाणून घेऊया.

भारतीय लष्कराकडून केला जाणारा सलाम

जेव्हा भारतीय सैन्यांकडून सलामी देिली जाते तेव्हा त्यांचा तळहात समोरच्या दिशेने पूर्णपणे उभा झालेला असतो. ही सलामी नेहमी त्याच हाताने केली जाते ज्याने सैनिक शस्त्र धारण करत असतो. या सलामीत हाताची बोटे सरळ असतात आणि भुवयाला किंवा टोपीच्या पट्टीला स्पर्श करतात. अशा प्रकारे सॅल्युट करणे म्हणजे सैनिक रिकाम्या हाताने असतो, त्याने शस्त्र कुठेही लपवले नाही आणि तो समोरच्या व्यक्तीला कोणताही द्वेष न करता सलाम करत असतो. पुर्णपणे उभा हात म्हणजे समोरासमोर केला जाणारा हल्ला असं समजलं जातं.

भारतीय वायूसेनेकडून केला जाणारा सलाम

भारतीय वायूसेनेची सलामी सैन्यातील सलामीपेक्षा वेगळी असून त्याचे हात जमिनीकडे 45 अंशाच्या कोनात वाकलेले असतात. Scoopwhoop वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 2006 साली भारतीय वायुसेनेने सलामीचे नवे नियम बनवले होते. सलाम करण्याच्या या पद्धतीमध्ये तळहात जमिनीपासून 45 अंशावर ठेवावा लागतो. तळहाताचा पुढचा भाग विमानासारखा वरच्या बाजूस उभा असतो. याआधी हवाई दल आणि लष्कराची सलामी सारखीच होती. वायुसेनेकडून आकाशातून हल्ला केला जातो म्हणून या सलामीत हात वरच्या बाजूला झुकलेला असतो असंही मानतात.

भारतीय नौदलाकडून केला जाणारा सलाम

लष्कराच्या तुलनेत नौदलातील सैनिकांची सलामी वेगळी असते. त्याचे हात जमिनीकडे 90 अंशाच्या कोनात वाकलेले असतात. समोरच्या व्यक्तीला ते आपला हात दाखवत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जे जवान जहाजांवर काम करतात किंवा खलाशी असतात, त्यांचे हात अनेकदा ग्रीस, तेल इत्यादींमुळे घाण राहतात, त्यामुळे ते आपले गलिच्छ हात कोणाला दाखवत नाहीत असं म्हणतात. नौदलाकडून पाण्याखालून किंवा पाण्यातून हल्ला केला जातो म्हणून हाताचा कोन 90 अंशात असतो असं मानलं जातं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply