Raver Lok Sabha : रक्षा खडसेंची रावेरमधून विजयाची हॅट्रिक

Raver Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघातून या पूर्वी दोन वेळेस निवडून आलेल्या भाजपच्या रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा ३ लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवत विजय निश्चित केला आहे. 

रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा सामना झाला. श्रीराम पाटील हे पहिल्यांदाच निवणुकीच्या रिंगणात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांच्या विरोधात त्यांच्या नणंद रोहिणी खडसे- खेवलकर या प्रचारात उतरलेल्या होत्या. मात्र एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर असल्याने त्यांनी देखील प्रचारादरम्यान मदत झाली. त्यामुळे काही ठिकाणी जिथे कमकुवत स्थिती होती, त्या ठिकाणी पक्ष मजबुतीने बांधला गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. 

Smita Wagh News : केलेल्या विकासाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला; विजयानंतर स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया

रावेर लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय पहिले असता सर्वाधिक मतदान हे मलकापूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे. भुसावळ मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रावेर लोकसभा मतदार संघात लेवा पाटीदार समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा फायदा निश्चितच रक्षा खडसे यांना झाला असल्याने रक्षा खडसे यांना ६ लाख २१ हजार ९४७ तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार १६८ इतके मते मिळाली आहेत. अर्थात रक्षा खडसे यांना चांगले मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply