Pune : दौंड येथे रेल्वेच्या रिकाम्या डब्ब्याला आग

दौंड रेल्वे स्थानकात साइडिंगला लावलेल्या रॅक मधील एका रिकाम्या डब्ब्याला मोठी आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर रॅकच्या वर उच्च क्षमतेच्या वीजवाहक तारा होत्या पण रेल्वे प्रशासनाने वेळीच आग विझविल्याने आग पसरली नाही.

दौंड रेल्वे स्थानकात आज दुपारी ही आग लागली. फलाट क्रमांक सहा पुढील पुणे बाजूला असलेल्या लोहमार्गावर प्रवासी डब्ब्यांचा एक रॅक साइडिंगला लावलेला आहे. त्यापैकी एक प्रवासी डब्बाला आग लागली. डब्ब्याच्या वर उच्च क्षमतेच्या वीजवाहक तारा असल्याने धोका मोठा होता.

दरम्यान आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून कडून आपत्कालीन परिस्थिती वाजविले जाणारे भोंगे वाजविण्यात आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या. दौंड लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, कॅरेज अॅण्ड वर्क्स , अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन, आदी यंत्रणा आग विझविण्यासाठी सक्रिय झाल्याने पुढील दुर्घटना टळल्या.

आगीमुळेडब्ब्यातील विद्युत उपकरणांसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सदर रॅक मध्ये आणि भोवती रेल्वे स्थानकातील कचरा टाकण्यात आला आहे. त्याशिवाय झुडपे वाढलेली असल्याने आगीचा धोका कायम आहे.

Dr. Mangala Narlikar : ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर कालवश; ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चार महिन्यात दुसर्यांदा आग ....

दौंड रेल्वे स्थानकात साइडिंगला लावलेल्या रॅक मधील एका रिकाम्या डब्ब्याला ३ मार्च रोजी सकाळी आग लागली होती. आज पुन्हा त्याच रेक मधील रिकाम्या डब्याला आग लागली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply