Pune : दहावीचा गणिताचा पेपर फुटला? विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार! तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर व्हायरल.

Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षेपूर्वीच गणित ‘एक’ आणि ‘दोन’ हे दोन्ही पेपर एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. याप्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ग्रुप अॅडमीन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांना ९ मार्च रोजी एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रुपची तपासणी केली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासणीदरम्यान ६ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-१’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ५ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी त्या ग्रुपवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, ९ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-२’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजे तीन दिवस आधीच ग्रुपवर उपलब्ध असल्याचे आढळून आले. ग्रुपवर प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिका आणि मंडळाने अधिकृतरीत्या घेतलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांची पडताळणी केल्यानंतर त्या दोन्ही एकसारख्या असल्याचे निदर्शनास आले.

या ग्रुपवर केवळ प्रश्नपत्रिका टाकल्या जात नव्हत्या, तर त्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे देण्यास प्रवृत्त करणारे मेसेजही पोस्ट करण्यात आले होते. ९ मार्च रोजी सायंकाळी ग्रुपवर ‘विज्ञान-१’ व ‘विज्ञान-२’च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा संदेश टाकण्यात आला होता व त्यासाठी एका आयडीवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर पेपरफुटीची माहिती समजल्यावर 66 आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होण्यासाठी आमचा आग्रह आहे. त्यामुळे मंडळामार्फत चौकशी करीत आहोत. संबंधित पेपरफुटी किती मोठ्या प्रमाणावर आणि कशी झाली, हे आताच सांगता येणार नाही.
- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य मंडळ



शहर

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *