Pune : पुण्याच्या तरुणाची प्रेरणादायी कामगिरी; सिद्धेश लांबाते पहिल्याच प्रयत्नात CA फायनल उत्तीर्ण

Pune : पुण्यातील सोमेश्वरवाडी, पाषाण परिसरातील सिद्धेश कल्याणी राजेंद्र लांबाते यांनी पहिल्याच प्रयत्नात CA फायनल परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत कठीण समजली जाणारी ही परीक्षा त्यांनी चांगल्या गुणांनी पास करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि घरात कोणतीही CA क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना सिद्धेश यांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यामुळे “मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही” हे त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे.

जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या CA FINAL परीक्षेत दोन्ही ग्रुपसाठी बसलेल्या २२,२९३ विद्यार्थ्यांपैकी फक्त २,४४६ विद्यार्थ्यांना यश मिळाले. या कठीण स्पर्धेत सिद्धेश लांबाते यांनी मिळवलेले यश विशेष ठरले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या मॉडर्न हायस्कूल (प्राथमिक व माध्यमिक), लॉ कॉलेज शिवाजीनगर येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय मौसम विभाग (IMD) शिवाजीनगर कार्यालय युनियन तर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला.

याशिवाय स्थानिक मान्यवरांनीही त्यांचे कौतुक केले असून नगरसेवक सनी निम्हण, प्रमोद अण्णा निम्हण, जयेश मुरकुटे आदींनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सिद्धेश लांबाते यांचे हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *