Pune News : पुण्यात CBI ची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला ८ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुण्यात महसूल विभागात एका उच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने आयएएस (IAS) अधिकारी डॉ. अनिल गणपतराव रामोड यांच्यावर सीबीआयचा छापे टाकले आहेत.  रामोड हे पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत

विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआय अधिकारी दाखल झाले आहेत. ८ लाख रुपयांची लाच घेताना त्यांनी अनिल रामोड यांना पकडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. हिरमोड यांनी ८ लाख रुपये स्वीकारताना त्यांना सीबीआयने त्यांना पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply