Pune News : पुणे जिल्ह्यात २३३ नवीन स्वस्त धान्य दुकाने होणार सुरु

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २३३ नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार पात्र इच्छुकांना परवाना घेण्यासाठी येत्या ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक ६८ नवीन स्वस्त धान्य दुकाने ही वेल्हे तालुक्यात सुरू करण्यात येणार आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी केवळ एक दुकान हे दौंड आणि इंदापूर तालुक्यात सुरु केले जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी बुधवारी (ता.३) सांगितले.

याबाबतचा जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात येणाऱ्या तालुकानिहाय गावांची यादी, या दुकानासाठी आवश्‍यक असलेल्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.

याशिवाय संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातही याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे डॉ. होळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवीन दुकानांची तालुकानिहाय संख्या :

- आंबेगाव व बारामती --- प्रत्येकी १०

- भोर --- ०७

- हवेली --- १७

- जुन्नर --- २६

- खेड --- ०८

- मावळ --- ३६

- मुळशी --- २८

- पुरंदर --- ०९

- शिरूर --- १२

- वेल्हे --- ६८

- दौंड व इंदापूर --- प्रत्येकी एक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply