Pune Metro : पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, शिवाजीनगर मेट्रोला ऑक्टोबरचा मुहूर्त; प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण

Pune Metro : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गिकेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हा मेट्रो मार्ग आगामी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. हे मार्ग सुरू झाल्यानंतर, पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येत निश्चितच कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मात्र, या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी नागरिकांना आणखी आठ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. प्रकल्पाच्या ८२ टक्के काम पूर्ण झाले असून, रुळ (लोहमार्ग) आणि ‘डक्ट’ (स्ट्रक्चरल) टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.


त्याचबरोबर, मेट्रो मार्गावर असलेल्या २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) आणि विद्यूत यंत्रणा कामे देखील अंतिम अवस्थेत आहेत. या सर्व कामांवर लक्ष ठेवून, सप्टेंबर महिन्यापर्यंत चाचणी घेण्याचे ठरले आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सर्व अंतिम कामे पूर्ण होईल आणि पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात मेट्रो मार्गिका धावायला सुरुवात करेल.

हा मेट्रो प्रकल्प पुण्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विशेषतः हिंजवडी, बालेवाडी, शिवाजीनगर आणि इतर प्रमुख भागांतील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे, जे पुणेकरांसाठी एक मोठा दिलासा ठरेल. तथापि, हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख निश्चित असली तरी, त्यातील अंतिम टप्प्यातील कामे आणि चाचण्या यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply