Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? जादूटोण्यासाठी विकलं सुनेच्या मासिक पाळीचं रक्त; सासरच्यांवर गुन्हा दाखल

Pune : महिलेचं मासिक पाळीचं रक्त जादूटोण्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. ही महिला विवाहित असून सासरच्या मंडळींनीच हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी या २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. २ वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीच्या प्रेम विवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली.

सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळीदरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून ते भरुन ५० हजारात जादूटोण्यासाठी विकलं. ही घटना या महिलेने आपल्या आईवडिलांना सांगितली, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

ज्या दिवशी ही महिला पोलिसांकडे आली त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसंच हे अघोरी कृत्य बीडमध्ये घडलं असून गुन्हा दाखल करुन पुढचा तपास तिकडे करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *