Pune : पुणेकरांसाठी गुड न्यूज : खडकवासला धरण १०० टक्के भरले

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला हे धरण हंगामात प्रथमच १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. त्यामुळे उजनी धरण भरण्यास मदत होते. यंदा मोसमी पावसाचे वेळेत आगमन होऊनही जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता.

Pune : पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का? केंद्र सरकारला संशय, पोलिसांना चौकशीचे आदेश !

जुलैच्या दुसरा आठवड्यापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चार-पाच दिवसांपासून धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या जोरधारांमुळे खडकवासला हे धरण पहाटे साडेतीनच्या सुमारास १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदीपात्रात दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने सकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून ४७०८ एवढा करण्यात आला. धरणक्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply