Pune : पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट, उंदरांनी घेतलेल्या चाव्यात विद्यार्थी जखमी, २ जणांना रेबिजची लक्षणं

Savitribai Phule Pune University News : पुणे विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. विद्यापीठात उंदरांनी सुळसुळाट घातलाय, पण प्रशासनाकडून कोणताही उपाययोजना केली जात नाही. उंदरांनी चावा घेतल्यामुळे विद्यार्थी जखमी झालाय. इतकेच नाही तर पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांना रेबिज आजाराची लक्षणं दिसत आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्र.6 या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांना रेबिजची लक्षणे आढळून आली आहेत. या विद्यार्थ्यांच्या साहित्याची नासधूस झालेली आहे. तीन महिन्यांपूर्वी मुख्य वसतिगृह प्रमुखांना या बाबत तक्रार सुध्दा दिलेली होती. तरीसुद्धा या विषयात कोणतीच दखल घेतलेली नाही. या सर्व गोष्टीवरून वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजी पणा दिसून येतो असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

Radhakrishana Vikhe Patil : उत्पन्नापेक्षा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नवे धोरण हवे; जलसंपदा मंत्री विखे पाटील

गेल्या तीन महिन्यांपासून हिंदी विभागाचे आणि अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मुख्य वसतिगृह प्रमुखांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत तरी एकदाही या विषयाची दखल घेतली गेली नाही असं सुद्धा आरोप आता करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याच्या पायाला सलग चार वेळा चावा घेतला आहे त्यामूळे त्या विद्यार्थ्याला 2 दिवस हॉस्पिटल दाखल केले होते. त्यामधे रेबीज या रोगाचे लक्षणं आढळून आले. खाण्याचे पदार्थ, कपडे आणी पुस्तकं यांची नासधूस केलेली आहे असं विद्यार्थ्यांचे मत आहे.

या विद्यार्थ्यांना त्वरीत नवीन रूम उपलब्ध करुन द्यावी आणि सर्व वसतिगृहात पेस्ट कंट्रोल करुन घ्यावे आणि स्वच्छते विषयी काळजी घ्यावी अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पुणे विद्यापीठाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply