
Pune : मतदानाच्या दिवशी मतदार घराबाहेर पडावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची पळापळ सुरू असते. मतदाराने मतदान केंद्रात येऊन मतदान केले, तरी मतदान कोणाला केले असेल, याचा अंदाज लागणे कठीण. त्यामध्येच काही बोगस मतदार येऊन मतदान करून जाण्याचे प्रकार आजही घडत असतात. पुण्यात नगरपालिका असताना मात्र चित्र वेगळे होते. मतदाराने मतदानासाठी येण्यापासून मतदान करेपर्यंत अनेक गमतीजमती घडायच्या. मतदाराने मतदान कोणाला केले, हे तर उघड-उघड समजायचे; पण बोगस मतदान होण्याला थारा नसायचा. कारण त्यावर तत्कालीन नगरपालिकेच्या प्रशासनाची भिस्त ही वसुली कारकुनावर होती. त्यामुळे बोगस मतदान हा प्रकारच होत नव्हता.
आज मतदानाच्या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरीही बोगस मतदान होण्याचे प्रकार घडतच असतात. मतदाराने मतदानाला यावे, यासाठी पूर्वी आणि आताही राजकीय पक्षांची धावपळ मतदानाच्या दिवशी सुरू असते. आता आचारसंहितेच्या कडक नियमांमुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणण्यासाठी उघडपणे काही करता येत नाही. मात्र, गुप्तपणे हे प्रकार सुरूच असतात.
मतदारांना मतदान केंद्रावर आणल्यावर त्याने मतदान कोणाला केले, याचा अंदाज बांधणे अवघड असते. मात्र, हमखास मत देणाऱ्या मतदारांची उमेदवार आणि त्याच्या विश्वासू साथीदारांना माहिती असते. त्यावरून प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले आणि आपापल्या हक्काच्या परिसरातील किती मतदारांनी मतदान केले, यावरून उमेदवार निकालाचा कल जाणतात. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी प्रत्येक मतदानाचे आकडे समोर येईपर्यंत कोणत्याही उमेदवाराच्या मनात धास्ती असते. त्यात बोगस मतदान झाले असेल, तर सर्वच गणिते बिघडतात.
|
Pune : रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’ |
सध्या बोगस मतदान रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा असतानाही बोगस मतदानाचे प्रकार घडतच असतात. नामसाधर्म्य पाहून एखाद्या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने मतदान करणे, मतदारसंघातील रहिवासी नसताना मतदारयादीत नाव समाविष्ट करून मतदान करणे असे प्रकार आजही घडताना दिसतात. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ होतो. निकाल जाहीर झाल्यावर सर्व काही थंडावते.
पुणे ही नगरपालिका असतानाही मतदानाच्या दिवशी अनेक गमतीजमती घडायच्या. त्या वेळी वॉर्डांची संख्या आणि मतदारांची संख्याही कमी असायची. प्रत्येक वॉर्डात एकच मतदान केंद्र तयार केले जायचे. त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या मतपेट्या ठेवल्या जात असत. काही उमेदवार अशिक्षित असायचे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रंगांचे वाटप करून मतपेट्यांना संबंधित रंगाचे कागद चिकटवून त्यावर उमेदवाराचे नाव लिहिण्यात येत असे. आचारसंहिता नसल्याने आणि उमेदवाराच्या खर्चावर मर्यादा नसल्याने त्या वेळी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी टांगे वापरले जायचे. टांग्यावर पुढे आणि मागे उमेदवाराच्या नावाचा फलक लावण्यात येत असे. उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणजे त्या भागातील वजनदार मंडळी असायची. मतदाराला मतपत्रिका दिल्यावर त्याची स्वाक्षरी आणि निरक्षर असल्यास अंगठा घेऊन कार्यकर्तेच मतपत्रिका उमेदवाराच्या मतपेटीमध्ये टाकत. त्यामुळे उमेदवाराला किती मतदान झाले आणि आणखी किती मतांची गरज आहे, याचा अंदाज उमेदवारांना येत असे. त्या दृष्टीने त्यांची मतदानाच्या दिवशी पळापळ सुरू असायची.
मात्र, बोगस मतदानाला वाव नसायचा. बोगस मतदानावर तत्कालीन नगरपालिकेने नामी युक्ती शोधून काढली होती. वसुली कारकुनावर सर्व भिस्त असायची. वसुली कारकून हे करवसुलीसाठी प्रत्येक घरी जायचे. त्यामुळे त्यांना प्रत्येक पेठेतील घरमालक ओळखीचे असत. वसुली कारकुनाकडून ओळख पटल्याशिवाय मतदाराला मतपत्रिका दिली जात नसे. त्यामुळे बोगस मतदान टाळले जायचे.
आता अत्याधुनिक युगात अनेक सुविधा झाल्या असताना अद्यापही पुण्यासारख्या शहरात मतदानाचे प्रमाण कमी असते. जेमतेम ५० टक्के मतदार मतदान करतात. उर्वरित मतदार उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागत नाहीत. उपलब्ध असलेल्या मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे आव्हान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे असणार आहे. बोगस मतदानाची ओरड प्रत्येक निवडणुकीत सुरूच असते. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे सर्व चित्र पाहायला मिळणार आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

