PUBG Train Accident : रेल्वे रूळावर बसून पबजी खेळत होते, रेल्वेनं उडवलं; तिघांचा मृत्यू

PUBG Train Accident : रेल्वे रूळावर बसून पबजी खेळणं तीन मुलांच्या चांगलंच जीवानीशी आलंय. बिहारमधील ३ मुलं रेल्वे ट्रॅकवर बसून पबजी गेम खेळत होते. कानात इयरफोन होते. त्यामुळे बाहेरचं काही ऐकू येणं शक्यच नाही. तिघंही खेळण्यात मग्न. समोरून ट्रेन आली, आणि ट्रेनच्या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या पश्चिमच्या चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंज ते मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनवर घडली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

चंपारण जिल्ह्यातील गुमटी येथील फुरकान आलम, सरीम आलम आणि हबीबुल्ला अन्सारी ही तिन्ही मुले रेल्वे रूळावर बसले होते. तिघंही पबजी गेम खेळण्यात गुंग होते. तसेच त्यांच्या कानात इयरफोन देखील होते. ते खेळण्यात इतके गुंग झाले की, त्यांना ट्रेनचा आवाज देखील ऐकू आला नाही. त्यामुळे कधी रेल्वे आली त्यांना कळालचं नाही. रेल्वे सुसाट वेगानं आली, आणि जबर धडक बसली. रेल्वेच्या या धडकेत तिघांचाही दुर्देवी मृत्यू झालाय.

Pune : ईएसआईसी उप-क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तिघांचा झालेल्या दुर्देवी मृत्यूनंतर, त्यांच्या कुटुंबियांनी तिघांचेही मृतदेह घरी नेले आणि तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली असून, नेमक्या कोणत्या कारणामुळे हा अपघात घडला याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

या धक्कादायक घडलेल्या घटनेची माहिती देताना एसडीपीओ विवेक दीप सांगतात, 'अपघात नेमका कसा घडला? अपघाताची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी, आमचा त्या दिशेनं तपास सुरू आहे. यासंदर्भात आम्ही कुटुंबियांचे जबाब घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्राथमिक तपासात तिघंही मुलं रेल्वे रूळावर बसून पबजी गेम खेळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुलांच्या गेमिंग सवयींबद्दल पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे.'

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply