Pakistan National Assembly Dissolved : पाकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी! मध्यरात्री संसद बरखास्त; राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

Pakistan National Assembly Dissolved : पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी काल (बुधवारी) मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.

संसद बरखास्त करण्यात आलेल्या पत्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्या आहेत. नॅशनल असेंब्ली संविधानाच्या आर्टिकल 58च्यानुसार ती भंग करण्यात आली आहे. संसदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ अधिकृतरित्या 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता, असं या नोटिफिकेशन्समध्ये सांगण्यात आलं आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारीश केली होती.

Sana Khan: भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्या! मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकला, एका आरोपीला अटक

आर्टिकल 58नुसार राष्ट्रपतीने पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार 48 तासात संसद बरखास्त केली नाही तर 48 तासानंतर संसद आपोआपच भंग होते.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाने 11 ऑगस्ट रोजी नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस केल्यास, राष्ट्रपती आरिफ अल्वी वेळेच्या कमतरतेच्या कारणास्तव कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याची अधिसूचना ताबडतोब जारी करतील, अशी भीती होती. आरिफ अल्वी हे माजी पंतप्रधान इम्रान यांच्या पक्षाचे माजी नेते आहेत, ज्यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी तुरुंगवास भोगावा लागला होता. अशा स्थितीत त्यांच्या या भूमिकेबाबत सरकार घाबरले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply