New Mahabaleshwar : साताऱ्यामध्ये तयार होणार नवीन महाबळेश्वर, MSRDC ने तयार केलाय प्लॅन; कसा असेल प्रोजेक्ट?

New Mahabaleshwar : साताऱ्यामधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणआर आहे. नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थामध्ये एमएसआरडीसीकडे प्लॅन तयार आहे. एमएसआरडीसीने नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केल्यापासून जवळपास ९०० प्रस्ताव दाखल झाले आहेत.

एमएसआरडीसीकडे दाखल झालेल्या ९०० प्रस्तावांमध्ये १० टक्केच प्रस्ताव हरकतींचे असून बाकी ९० टक्के प्रस्ताव सूचनांचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एमएसआरडीसीने १० ऑक्टोबर २०२४ ला नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या सुधारीत मसुदा विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. नवीन महाबळेश्वर या प्रकल्पामध्ये सहभाही होण्यासाठी अनेक गावं इच्छुक आहेत.


यापूर्वी डिसेंबरमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत नागरिकांच्या चिंता दूर करण्यासाठी मुंबईत मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीला २३५ प्रस्तावित गावांपैकी १०५ गावांचे प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. पाचगणीतील गावे आणि पश्चिम घाटाच्या जवळपासच्या इको-सेन्सिटिव्ह भागांचाही या प्रकल्पात समावेश करण्याच्या मागण्या आल्या आहेत, असे एमएसआरडीसीचे अधिकारी भोपळे यांनी सांगितले.

Pune Metro : चोरट्यांचा प्रताप, चक्क पुणे मेट्रोच्या खांबांची चोरी, ६ जणांना ठोकल्या बेड्या


नवीन महाबळेश्वरसाठी ९०० प्रस्ताव आले होते. यामध्ये १० टक्के प्रस्ताव हरकतींचे असून उर्वरीत ९० टक्के सूचना आल्या आहेत. सूचना आणि हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.

 


नवीन महाराष्ट्र प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्टे -

– पर्यटन विकासाचे प्रभावी व्यवस्थापन

– २० पर्यटन केंद्रांची वाढ

– स्थानिक ग्रामस्थ, छोटे व्यापारी, तरुण, उद्योजक आणि कारागीर यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे

– आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी स्थानिकांचा सहभाग

असा आहे विकास आराखडा -

- महाबळेश्वर परिसरातील २९३ गावांचा समावेश

- १,१५३ चौरस किलोमीटर

नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन अधिसूचित क्षेत्र

- कनेक्टिव्हिटीसाठी रोप-वे आणि जलमार्गावर भर

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply