Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, संपूर्ण मुंबईत उद्यापासून ५ टक्के पाणीकपात

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी  महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये ३० मे म्हणजे उद्यापासून ५ टक्के पाणीकपात होणार आहे. तर येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात  होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून  करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाल्यामुळे पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात होणार आहे. पाणीकपात लक्षात घेता मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

CM Eknath Shinde : शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा

मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासारख्या तलाव आणि धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो.

पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी पालिकेकडून सूचना -

- दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.

- गरज आहे तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ करावी.

- नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

- नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत ठेवा.

- नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा.

- उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेवढेच पाणी पिण्यासाठी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी.

- सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कुठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी.

- छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

- ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply