Mumbai Rain Updates : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण; अंधेरी सबवे बंद, मध्य रेल्वेची वाहतूकही उशीराने

Mumbai Rain : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईसह उपनगरातही पावसाची संततधार सुरूच असून सखल भागात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई लोकलला देखील बसला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून मुंबई आणि उपनगरातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. कुर्ला, चेंबूर, अंधेरी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे देखील जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला ये जा करणाऱ्या वाहन चालकांना आणि नागरिकांना या ठिकाणाहून जाण्यास वाहतूक पोलिसांनी बंदी केली आहे.

Kolhapur Rain Updates: कोल्हापूरला आज ऑरेन्ज अलर्ट, पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सध्या पाऊस जरी थांबला असला तरी सबवेतील पाणी ओसरण्यास काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुख्य रेल्वेमार्ग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ कर्जत/ खोपोली तसेच हार्बर मार्ग (CSMT ते पनवेल- वाशी) ट्रान्स हार्बर (ठाणे- वाशी/पनवेल) तसेच बेलापूर- नेरळ- खारकोपर लाईन या चारही मार्गांवर ट्रेन सुरळीत सुरु आहेत. तर काही ठिकाणी लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या अपडेटनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे (चर्चगेट- डहाणू) व पश्चिम हार्बर (माहीम- गोरेगाव) या दोन्ही लाईनवरील ट्रेन नियमित वेळेनुसार धावत आहेत. प्रवाशांच्या माहितीनुसार काही स्थानकांमध्ये ट्रेन १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply