Mumbai News : धक्कादायक! कूपर रूग्णालयाबाहेर ४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह,विष देऊन मारल्याचा संशय

Mumbai News : विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयाच्या आवारात चार भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळून आले आहे. भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले असल्याचा संशय प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि प्राणी मित्र संघटनेंनी मिळून जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळल्याने कूपर रुग्णालयाच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, जुहू पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केलाय. भटके कुत्रे विषबाधामुळे दगावले की यामागे आणखीन काही कारण आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी जुहू पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली आहे.

Mahakumbh cylinder blast : महाकुंभमेळ्यातील स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात, ई-मेल पाठवत घेतली जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. या कुत्र्यांना रुग्णांचे नातेवाईक किंवा प्राणी मित्र संघटनेकडून अन्नदेखील दिले जात होते. मात्र याच भटक्या कुत्र्यांमधील चार कुत्र्यांचा मृतदेह मंगळवारी आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासन आणि प्राणी मित्र संघटनेला मिळताच, त्यांनी जुहू पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

प्राणी प्रेमी आणि प्युअर ॲनिमल लव्हर्स (PAL) फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार रोशन पाठक यांनी मृत कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलंय. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना १८ ते २१ जानेवारी दरम्यान घडली होती. या दरम्यान चार कुत्र्यांना विष देऊन ठार करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कुत्र्यांच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply