Mughal Garden Name Change : राष्ट्रपती भवनच्या मुघल गार्डनचे नाव बदलले! आता 'अमृत उद्यान' या नावाने ओळखले जाणार

Mughal Garden Name Change: स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती भवनच्या मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आले आहे. आता हे गार्डन 'अमृत उद्यान' म्हणून ओळखले जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील हे गार्डन त्याच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ते पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

या गार्डनमध्ये सुमार 138 प्रकारचे गुलाब, 10,000 पेक्षा जास्त ट्यूलिपची फुलं आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5,000 हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुले केले जाते. आता हे उद्यात मुघल गार्डनऐवजी 'अमृत उद्यान' म्हणून ओळखले जाईल.

हे गार्डन 12 भागात विभागले गेले आहे. यात रोझ गार्डनसह बायो डायव्हर्सिटी पार्क, हर्बल गार्डन, बटरफ्लाय, म्युझिकल फाउंटन, सनकेन गार्डन, कॅक्टस गार्डन, न्यूट्रिशनल गार्डन आणि बायो फ्युएल पार्कचा समावेश आहे. याठिकाणी आलेल्या पर्यटकांना विविध प्रकारची फुले पाहता येऊ शकतात. येथे तुम्ही ट्यूलिप, मोगरा, रजनीगंधा, बेला, रातरानी, ​​जुही, चंपा-चमेली अशी अनेक प्रकारची फुलं पाहू शकता.

३१ जानेवारीला खुले होईल गार्डन

दरवर्षी हे गार्डन सामान्य लोकांसाठी खुले केले जाते. यंदा ३१ जानेवारीला हे गार्डन खुले होणार असून २६ मार्चपर्यंत म्हणजे सुमारे दोन महिने खुले राहील. या काळात रोज गार्डन उघडण्याची वेळ सकाळी १० वाजता असेल आणि संध्याकाळी ४ वाजता ते बंद होईल. त्यानंतर २८ मार्चला हे गार्डन शेतकऱ्यांसाठी, २९ मार्चला दिव्यंगांसाठी आणि ३० मार्चला पोलिस आणि सैनिकांसाठी खुले राहील.

अशी असेल व्यवस्था

राष्ट्रपतीभवनातील या अमृत उद्यानात सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 7500 लोकांना प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर 12 ते 4 या वेळेत 10000 लोकांना प्रवेश दिला जाईल. या गार्टनमध्ये पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आले आहेत, तसेच येथे फूड कोर्टही सुरू होणार आहे. येथे आलेल्या नागरिकांना क्यूआर कोडवरून वनस्पतींच्या विविध प्रकारांची माहिती मिळेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply