Manoj Jarange Patil : यांना पाठिंबा; उद्या लातूर, बीडमध्ये बंद

Manoj Jarange Patil : मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपाेषणास पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने उद्या (बुधवार) लातूर  आणि बीड  येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. साम टीव्हीशी बाेलताना दाेन्ही जिल्ह्यातील मराठा समाजाच्या समन्यवकांनी मनाेज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकराने मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. 

लातूरला बैठक संपन्न

गेल्या 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सगे-सोयरे या अध्यादेशासाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत. दरम्यान त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने लातूर बंदच आवाहन करण्यात आले आहे. आज मराठा समाजाच्या वतीने बैठक घेत एक दिवसीय लातूर बंदचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कुलदीप सूर्यवंशी यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Pune News : कर्नाटकातील कुख्यात डीएमसी टोळीचा प्रमुख पुणे पोलीसांच्या ताब्यात

सरकारने तात्काळ आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊन मराठा आंदोलनावर तोडगा काढावा. मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काही झालं तर खूप मोठा उद्रेक होईल असा इशारा बीड येथील गंगाधर काळकुटे (मराठा क्रांती मोर्चा समन्वयक) यांनी दिला आहे.

उद्या बीड बंद

दरम्यान उद्या बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक काळकुटे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply