Maharashtra Politics : भाजप-शिवसेनेतील वाद अखेर मिटला; कल्याण लोकसभेची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळणार

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रिकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेच्या जागेवरुन सेना- भाजपमध्ये धुसफूस पाहायला मिळत होती. अखेर या वादावर तोडगा निघाल्याचे संकेत मिळाले असून भाजप ही जागा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण लोकसभेच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगल्याच्या चर्चा काही दिवसांपासून समोर येत होत्या. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध होता.

Pune Accident: संसार सुरु होण्याआधीच मोडला! देवदर्शनाला जाताना रिक्षा विहिरीत कोसळली; नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू

परंतु आता हा वाद मिटला असून भाजपकडून ही जागा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षांमधील कटुता मिटवण्यासाठी याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला तर ठाणे लोकसभेची जागा भाजपला सोडावी.. असा प्रस्ताव मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनीही महत्वाचे विधान केले आहे. कल्याणच्या जागेवरुन आमच्यात कोणताही वाद नाही. जागा वाटपाचा निर्णय हा वरिष्ठ घेतात. आम्हाला मिळून मिसळून काम करण्याचे आदेश दिले आहेत.. असे ते याबद्दल बोलताना म्हणाले आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply