Loksabha MP's suspended : मोठी बातमी! लोकसभेतून १५ खासदारांचे निलंबन; कारण काय?

Loksabha MP's suspended : सभागृहातील कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या १५ खासदारांपैकी ५ खासदार हे कॉंग्रेसचे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सभागृहात विरोधकांनी मोठा गोंधळही केल्याचे पाहायला मिळाले होते.

Allahabad University News : अलाहाबाद युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये बॉम्ब बनवत होता विद्यार्थी; स्फोट झाल्याने गंभीर जखमी

काल झालेल्या या घटनेवर गंभीर दखल घेत विरोधकांच्या १५  खासदारांचे निलंबन केले आहे. सभापतींनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांची नावं दिल्यानतंर 15 विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

कोण आहेत १५ खासदार?

या १५ मध्ये लोकसभेच्या टीएन प्रथापन, हीबी एडेन, जोथिमनी, राम्या हरिदास , डीन कुरियाकोस, बेनी बेहानान, वीके श्रीधरन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोई करुणानिधि, के सुब्रमण्यन, एसआर पारथीबान, एस वेंकटेशन , मणिकम टैगोर या खासदारांचा समावेश आहे. तर राज्यसभेतून डेरेक ऑब्रायान यांना निलंबित करण्यात आले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply