Latur News : हात पाय ताेडण्याची भाषा करत 25 ते 30 जणांकडून पोलिस उपनिरीक्षकास बेदम मारहाण

Latur News : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अवैध मटका चालकाच्या जमावाने कारवाईसाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याबाबतची तक्रार हनुमंत घुलेंनी पाेलिस ठाण्यात दिली आहे.

घुले यांनी दिलेल्या माहितीनूसार रेणापूर तालुक्यातल्या कुंभारी पाटी जवळ अवैध मटका अड्डा येथे कारवाईसाठी गेलाे हाेताे. तेथून काही जणांना पळ काढला. त्यानंतर मटका चालकांनी रस्त्यात अडवले. जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली.

Chhagan Bhujabal : छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

दरम्यान याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात तक्रार करूनही वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी तक्रार घेतली नाही असा गंभीर आरोप घुलेंनी केला आहे. पोलिस ठाण्यातील अधिकारीच पाेलिसांना न्याय देऊ शकत नसले तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *