Kolhapur Fire : कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घरांना भीषण आग, घटनास्थळी अनेक फटाक्यांची दुकाने

Kolhapur Fire : कोल्हापुरातून आगीची मोठी अपडेट समोर आली आहे. कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच गर्दी झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार,कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील शाहू मिल परिसरात आग लागल्यानंतर परिसरात लोकांची एकच धावाधाव झाली.

Satara News : दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

आग लागल्याची माहिती मिळताच चार अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरात अनेक फटाक्याची दुकाने आहेत.  

कोल्हापुरातील शाहू परिसरात घरांना लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच लोकांची गर्दी जमा झाली. घरांच्या बाजूला असलेल्या फटाक्यांची दुकाने असल्याने मोठा भडका उडण्याची भीती अनेक जण व्यक्त करत होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply