King Charles III : इतिहासात पहिल्यांदाच राज्य़ाभिषेकात हिंदू धर्मगुरू सहभागी; मुंबईच्या डबेवाल्यांनाही आमंत्रण

किंग चार्ल्स यांचा शनिवारी ब्रिटनमध्ये राज्याभिषेक होणार आहे. राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर चार्ल्स सम्राट बनले, आता त्यांना राज्याभिषेक करण्याच्या शाही परंपरेचे पालन करेल. राणी एलिझाबेथचा राज्याभिषेक २ जून १९५३ रोजी झाला होता. सुमारे शंभर देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राजघराण्यांचे प्रमुख या हजार वर्ष जुन्या परंपरेचे साक्षीदार असतील.

७० वर्षांनंतर ब्रिटन पुन्हा एकदा राज्याभिषेकाचे साक्षीदार होणार आहे. तसे, राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतरच प्रिन्स चार्ल्सला सम्राटाचा दर्जा मिळाला. मात्र आता त्यांचा विधीवत राज्याभिषेक करण्याची शाही परंपरा शनिवारी म्हणजे आज पाळली जाणार आहे. सुमारे शंभर देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राजघराण्यांचे प्रमुख या काळात हजार वर्ष जुन्या परंपरेचे साक्षीदार असतील.

शाही पद्धतीचा हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. यासह, सम्राट चर्च ऑफ इंग्लंडचा प्रमुख बनतो आणि त्याला विशेष अधिकार प्राप्त होतात. मात्र, ही परंपरा अनिवार्य नाही. राजा एडवर्ड सातवा राज्याभिषेक न करता सिंहासनावर बसला.

२२०० हून अधिक शाही पाहुणे, राजघराण्यातील सदस्य आणि भूतान, थायलंड, जपानसह सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी, गेल्या वर्षी ८ सप्टेंबर रोजी प्रिन्स चार्ल्स यांना औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आले. राजा चार्ल्स न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह १५ देशांचा सम्राट होणार या अर्थाने ही परंपरा खूप महत्त्वाची आहे.

चार्ल्स कायदा आणि चर्च ऑफ इंग्लंड यांचे समर्थन करण्याची शपथ घेतील. मग ते सिंहासनाच्या खुर्चीवर बसतील. मुख्य बिशप त्यांच्या हातांना आणि डोक्याला पवित्र तेलाने अभिषेक करतील.सम्राटाला धार्मिक आणि नैतिक अधिकारांचे प्रतीक असलेला शाही ओर्ब आणि राजदंड दिला जाईल. शेवटी, सेंट एडवर्डचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला जाईल. राणी कॅमिलाच्या राज्याभिषेकाच्या वेळीही हीच प्रक्रिया केली जाईल. यानंतर, सम्राट राज्याभिषेक खुर्चीवरून उठून सिंहासनावर बसतील.

बौद्ध-हिंदू धर्मगुरूंचाही सहभाग असेल

ब्रिटिश राजेशाहीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या वारसाला राज्याभिषेकासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली. या वेळी पहिल्यांदाच बौद्ध, हिंदू, ज्यू, मुस्लिम आणि शीख धर्मगुरूही राज्याभिषेकाच्या विधीत सहभागी होतील. या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांची पत्नी उपस्थित राहतील. तर जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन याही उपस्थित राहतील. तसंच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड, त्यांच्या पत्नीही उपस्थित राहतील. शिवाय, अभिनेत्री सोनम कपूर आणि मुंबईचे दोन डबेवाले यांनाही आमंत्रण आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply