Pune News : वारजे ते कोंढवे-कोपरे रस्त्यावर ठिकठिकाणी साचते पाणी; वाहतूक ठप्प, उपाययोजनेची मागणी

Khadakwasla : पावसाळा सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे वारजे ते कोंढवे कोपरे या सुमारे आठ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ होऊन वारंवार कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी महापालिकेने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरेपर्यंतच्या रस्त्यावर १० ते १२ ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना छोटे पूल गायब झाल्याने येथे पाणी निचरा होण्यासाठी पर्याय उरला नाही.

त्यानंतर हा भाग महापालिकेत समावेश झाला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यावर येथे वाहतूक यंत्रणा पोहचण्यासही वेळ लागतो. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वारजे ते कोपरेपर्यंतच्या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

पाणी साचण्याची ठिकाणे, कारणे व परिणाम

Tomato Rate Hike: कांद्यानंतर आता टोमॅटोही रडवणार, टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ !

१. वारजे गणपती माथा ते शिवणे शिंदे पूल महापालिकेने पावसाळी वाहिनी टाकली असूनही ठिकाणांवर परिसरातून वाहून आलेले पाणी येथे जमा होत आहे. असून पाण्याचा निचरा होण्यासाठीचा पूलही आता येथे नाही.

२. शिवणे-दुधाणे पेट्रोल पंप कॉक्रिटच्या रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्यामुळे येथे साचणारे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे.

3. सारस्वत बैंक आणि बैंक ऑफ इंडिया मुख्य रस्ता व पादचारी मार्ग समपातळीत नसल्याने येथे खड्डा तयार झाला आहे. तसेच येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नाही परिणामी दोन ते चार दिवस येथे पाणी तसेच राहत आहे. याचा त्रास पादचारी व वाहनचालकाना होत आहे.
४. इंगळे कॉलनी, शाहू बँक- यापूर्वी अरुंद रस्ता असताना येथे पूल होता. रस्त्याच्या रुंदीकरणानंतर पूल काढण्यात आला. या ठिकाणी रस्त्याला वळण आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अर्ध्या रस्त्यावर साचल्याने वारजेकडे जाणारी वाहतूक विरुद्ध बाजूने जाते. परिणामी कोंडी होते.

५. उत्तमनगर, बाजार समिती - समितीच्या भिंतीमुळे एनडीएतून बाहेर आलेले पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. परिसरातील घरांमध्येही हे पाणी शिरते. रस्त्याजवळील पुलाची एक बाजू बंद असल्याने पाण्याचा निचरा नाही. त्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहते.

६. जलशुद्धीकरण केंद्र येथील रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी साचते. रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. पाणी निचरा होण्याची व्यवस्था पुरेशी नाही. पूर्वी रस्ता अरुंद असताना येथे पूल होता. रस्ता रुंदीकरणनतर पूल गायब झाल्याने ही समस्या उदभवली आहे.
7. ७. कोंढवे धावडे पूल - जुन्या पुलाप्रमाणेच नवीन पूलही बांधण्यात आला. रस्त्यावरून दोन्ही बाजूने सुमारे अर्धा किलोमीटरवरून पावसाची पाणी वाहत येते. ते वाहून जाण्याची पुलावर व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे येथे दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होते.

जलशुद्धीकरण केंद्रासमोर सेवालालनगर आणि गणपती मंदिरापासून पाणी वाहत येते. रस्त्यावर खड्डे झाल्याने गुडघ्यापर्यंत पाणी साठते. त्या पाण्यात मोठे वाहन मेले की लाट तयार होऊन ते पाणी या परिसरातील दुकानांत व घरांमध्ये शिरते. हे पाणी जाण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहिनी केलेली नाही. त्यामुळे या परिसरापासून ते भीमनगरच्या ओढ्यापर्यंत पावसाळी वाहिनी टाकावी.

- सागर बारटक्के, ग्रामस्थ

रस्त्याचे रुंदीकरण करताना पाप्पी जाण्यासाठीची व्यवस्था पुढे कायम केलेली नाही. परिणामी पाणी साचते आणि त्यानंतर वाहतूक कोंडी होते. पाणी साचल्याची माहिती मिळताच आमच्या पातळीवर कार्यवाही केली जाते. जास्तीत जास्त ठिकाणी पावसाळी वाहिनी वसवण्यासाठी निधी अंदाजपत्रक केले आहे. तसेच काही ठिकाणी कामही सुरू केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply