ISRO SSLV-D2 Launch : तीन उपग्रहांसह इस्त्रोने लाँच केलं SSLV-D2 रॉकेट; जाणून घ्या खासीयत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शुक्रवारी आपले नवीन आणि सर्वात लहान रॉकेट SSLV-D2 (स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) अंतराळात सोडले. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.

SSLV-D2 ने तीन उपग्रह घेऊन अवकाशात उड्डाण केले, ज्यात अमेरिकन कंपनी Antaris चा Janus-1, चेन्नई स्थित स्पेस स्टार्टअप स्पेसकिड्ज (SpaceKidz's) चा AzaadiSAT-2 आणि ISRO चा उपग्रह EOS-07 यांचा समावेश आहे. हे तीन उपग्रह 450 किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकार कक्षेत स्थापित केले जातील.

इस्रोच्या मते, SSLV चा वापर खालच्या कक्षेत 500 किलोपर्यंतचे उपग्रह सोडण्यासाठी केला जातो. हे मागणीनुसार रॉकेटच्या आधारावर किफायतशीर खर्चात उपग्रह प्रक्षेपण करण्याची सुविधा उपलब्ध करते. 34 मीटर उंच SSLV रॉकेटचा व्यास 2 मीटर आहे. हे रॉकेट एकूण 120 टन वजन घेऊन उड्डाण करू शकते.

गेल्या वर्षी या रॉकेटचे पहिले उड्डाण ऑगस्टमध्ये निकामी झाले होते. गेल्या वर्षी, एसएसएलव्हीच्या पहिल्या प्रक्षेपण यशस्वी होऊ शकले नाही. तसेच रॉकेटचे सॉफ्टवेअर चुकीच्या कक्षेत उपग्रह लाँच करत होते, त्यामुळे इस्रोने एसएसएलव्हीचे प्रक्षेपण रद्द केले होते.

SSLV-D2 चे एकूण वजन 175.2 kg आहे, ज्यामध्ये 156.3 kg वजनाचा इओएस उपग्रह, 10.2 kg वजनाचा Janus-1 आणि AzaadiSat-2 हा 8.7 kg आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार एसएसएलव्ही रॉकेटची किंमत सुमारे 56 कोटी रुपये आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply