KL Rahul Breaks MS Dhoni Record : केएल राहुलनं धोनीच्या साक्षीने मोडला 'थाला'वाला विक्रम! बनला IPL चा नंबर 1 विकेटकीपर

KL Rahul Breaks MS Dhoni's All-Time Record : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळीनंतर एक मोठा विक्रम केला आहे. तो आता आयपीएलच्या इतिहासात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक पन्नास प्लस धावा करणारा फलंदाज बनला आहे. या प्रकरणात केएल राहुलने एमएस धोनीचा विक्रम मोडला.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 53 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावांची जबरदस्त खेळी केली. आणि त्याच्या संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे होते. आता केएल राहुलने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून 25 फिफ्टी प्लस स्कोअर केले आहेत. आणि या बाबतीत तो एमएस धोनीच्या पुढे गेला आहे.

Taloda News : गुटखा विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल; ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून 24 पन्नास प्लस धावा केल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा क्विंटन डी कॉक आहे. ज्याने 23 वेळा ही कामगिरी केली आहे. या सामन्यातही त्याने शानदार अर्धशतक झळकावले. तर दिनेश कार्तिक 21 पन्नास प्लस स्कोअरसह चौथ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 34 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या.

प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सने हे लक्ष्य 19 षटकांत केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. मात्र, या विजयानंतरही लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर CSK तिसऱ्या स्थानावर कायम आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply