G20 Summit : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षाही पॉवरफुल आहे सीक्रेट एजन्सी! पाहा या एजन्सीचे कसे असते कार्य

G20 Summit : आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली जी20 शिखर परिषदेसाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. पाहुणेमंडळींच्या खाण्यापिण्याच्या सोयीपासून ते त्यांच्या सुरक्षेशी संबंधित चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय यंत्रणांसह त्यांच्या स्वतःच्याही सुरक्षा यंत्रणा दिल्लीत तळ ठोकून आहेत. 

दरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याच वाहनांचा सर्वात मोठा ताफा असेल, असे म्हटलं जात आहे.  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत सीक्रेट सर्व्हिसची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कारण राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सीक्रेट सर्व्हिस एजेंट्सवर असते. राष्ट्राध्यक्ष परदेशी दौऱ्यावर असतानाही सीक्रेट सर्व्हिसकडेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. 

हेच सीक्रेट सर्व्हिस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना अभेद्य सुरक्षा पुरवणार आहेत. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष व्हिलियम मॅककिन्ले यांच्या हत्येनंतर वर्ष 1901नंतर सीक्रेट सर्व्हिसची सेवा सक्रिय झाली. या घटनेनंतर सीक्रेट सर्व्हिसकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासंबंधीचे विधेयक वर्ष 1906 मध्ये संसदेनं मंजूर केलं होतं. बदलत्या काळानुसार सर्व्हिसमधील कार्याचा विस्तारही करण्यात आला. 

MSRTC News : ST कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

सीक्रेट सर्व्हिस कोणकोणत्या स्वरुपात करते काम व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कशी पुरवते सुरक्षा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

  • सुरक्षित अमेरिका व्हिजनचा एक भाग म्हणून सीक्रेट सर्व्हिस कायदा अधिकारी, शाळा सुरक्षा पार्टनर्स आणि विविध समुहांसह समन्वय साधत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून सुरक्षा पुरवण्याचे कार्य करते.

    •  एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरीद्वारे सीक्रेट सर्व्हिसकडेच या कार्यक्रमाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. 

    • देशातील प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या सुरक्षेतही याच सर्व्हिसची सेवा तैनात असते.

     
    • राष्ट्राध्यक्षांचा एखादा परदेश दौरा निश्चित झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिस तीन महिने आधीपासूनच त्यांच्या सुरक्षेचं नियोजन आखण्यास सुरुवात करतात. 

    • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, व्हाइट हाऊस, अमेरिकीचे उच्च सुरक्षा अधिकारी आणि अमेरिकेला भेट देणाऱ्या हाय-प्रोफाइल नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे कार्य सीक्रेट सर्व्हिस करते.

     
    • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेथे कुठेही प्रवास करतात, त्यांच्यासोबत अमेरिकेतील सीक्रेट सर्व्हिसचे पथक सुरक्षेसाठी तैनात असतेच.

    • राष्ट्राध्यक्षांच्या आगमनापूर्वी कित्येक आठवडे आधीच हे पथक तेथे जाऊन सुरक्षेची खात्री करून घेतात. प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घेतात आणि आपल्या देशात परततात.

     
    • राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी वास्तव्य करणार असतात, तेथील रस्त्यांपासून ते राहत्या ठिकाणीच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली जाते. 

    • राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या जवळपास एक महिन्याभरापूर्वी अमेरिकी एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक त्या-त्या ठिकाणांचा दौरा करतात. यानंतर दोन आठवड्यांनंतरही आणखी एक टीम तेथे पोहोचते.  

     
    • या दोन्ही पथकांच्या रिपोर्टनंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वाहन, अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे प्रशिक्षित श्वान या ठिकाणांचा दौरा करतात.

    • राष्ट्राध्यक्षांच्या दौरादरम्यान जवळपास 24 प्रशिक्षित श्वानांचा समावेश केला जातो.

    सीक्रेट सर्व्हिसकडून इतक्या सूक्ष्म, शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply