
पुणे : जी २० परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत.
नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, जी २० या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत, आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्या क्रमांकावर जाऊ अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक मंदीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, जगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या देशांना आहे. भारताला त्याची झळ बसू नये आणि मंदी आली तर जूननंतर येईल. मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत”, असेही नारायण राणे म्हणाले.
शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेचा जी डी पी २० ट्रिलियन आहे. भारत ५ ट्रिलियनपर्यंत पोहचू पाहत आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी. यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. तसेच जी २० परिषदेमध्ये देखील यावर चर्चा होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर परिषदेत विशेष चर्चा होणार असून केंद्र सरकार युद्ध पातळीवर पावल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती























Subscribe to my channel


