Bodwad Heavy Rain : बोदवड तालुक्यात जोरदार पाऊस; लोणवाडी परिसरात घरात शिरले पाणी

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा होती. तर मागील महिन्यात रावेर तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला होता. तर आता बोदवड तालुक्यांतील लोणवाडीत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे परिसर जलमय झाला आहे. तर लोणवाडी गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. 

पावसाला सुरु झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सुरवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र काही भागात पाऊस अत्यल्पच झाला होता. तर रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, यावल तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यानंतर पुन्हा एकदा या परिसरात पाऊस झाला आहे. आता बोदवड तालुक्यात अनेक भागात पुन्हा एकदा पाऊस झाला आहे. यामुळे लोणवाडी परिसरात काही घरात पाणी शिरले होते. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला.

Pune Fraud: म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून जोडप्याने अनेकांना घातला लाखोंचा गंडा; पती- पत्नीविरोधात तक्रार दाखल

पिकांचे देखील नुकसान 

यंदा बोदवड तालुक्यात पावसाचे पुनरागमन केले आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसाचा फटका मका, कापूस आणि कडधान्य या पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply