सावधान! वर्षभरात बनावट नोटांचा वापर दुप्पटीने वाढला;केंद्र सरकारच्या चिंतेत भर

नवी दिल्ली : देशातील लोकांच्या व्यवहारामध्ये बनावट नोटांचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे ताज्या आकडेवारीनुसार , वित्तीय वर्ष २०२१-२२ या वर्षात खोट्या नोटा वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. ५०० रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर २०२०-२०२१ या वर्षात १०१.९ टक्क्यांनी वाढला आहे. तर २००० रुपयांची खोट्या नोटा  वापरण्याचे प्रमाण हे ५४.१६ टक्क्यांनी वाढले आहे,अशी माहिती केंद्रीय बँकानी दिली आहे. त्यामुळे ही बाब देशातील लोकांची चिंता वाढवणारी आहे

३१ मार्च २०२२ मार्च पर्यंत बँकेत ५०० रुपये आणि २००० रुपयांच्या जमा करण्यात आलेल्या नोटांमध्ये ८७.१ टक्के खोट्या होत्या. तर ३१ मार्च २०२१ पर्यंत खोट्या नोटांचे प्रमाण ८५.७ टक्के होतं. ३१ मार्च २०२२ मार्च पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा या सर्वाधिक बनावट होत्या. या बनावट नोटांचे प्रमाण ३४.९ टक्के होते.

गेल्या वर्षाच्या तुलनेत १० रुपये, २० रुपये, २०० रुपये,५०० रुपये आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा अनुक्रमे १६.४ टक्के, १६.५ टक्के, ११.७ टक्के , १०१.९ टक्के आणि ५४.६ टक्के वाढ झाली आहे. या बनावट नोटांमध्ये ५० रुपयांच्या खोट्या नोटा २८.७ टक्के आणि १०० रुपयाच्या खोट्या नोट्यांमध्ये १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, २००० रुपयांच्या बँकांच्या नोटांची संख्या गेल्या वर्षभरापासून कमी-कमी होत चालली आहे. त्यामुळं देशातील जनतेची चिंता वाढवली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यावेळी ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या. तरीही बाजारात खोट्या नोटांचे प्रमाण वाढल्यानं केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply