Baku : युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ

Baku : जागतिक हवामान बदलाविषयीची संयुक्त राष्ट्रांची सर्वात महत्त्वाची सीओपी२९ परिषद सोमवारपासून अझरबैजानच्या बाकू शहरात सुरू झाली. परिषदेच्या पहिल्याच दिवशी युद्धादरम्यान वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे सांगत युद्ध थांबवण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली.

पश्चिम आशियामध्ये गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरपासून इस्रायलचे एकाचवेळी गाझामध्ये हमासविरोधात आणि लेबनॉनमध्ये हेजबोलाविरोधात युद्ध सुरू आहे. तर रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धाला पावणेतीन वर्षे होत आली आहेत. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आहे. तसेच गाझा जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. मनुष्यहानीबरोबरच या सांपत्तिक नुकसानाचीही चर्चा होत असतानाच युद्धामुळे हवामान बदलाचे संकट वाढल्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. हाच मुद्दा विविध एनजीओंनी परिषदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित केला.

Nagpur News : नागपूर मविआमध्ये बिघाडी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांचा प्रचार

एनजीओंनी गाझा युद्धात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि युद्ध तातडीने थांबवण्यासाठी जगाने इस्रायलवर दबाव टाकावा अशी मागणी केली. ‘‘युद्धाच्या चक्रामुळे नि:संशयपणे हरितवायूंचे जागतिक उत्सर्जन वाढत आहे आणि हवामान संकटाला सक्रियपणे व निर्णायकपणे प्रतिसाद देण्याच्या आमच्या क्षमता नाहीशी होत आहे,’’ असे या एनजीओंनी प्रसृत केलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले.

युद्धामुळे वाढलेले उत्सर्जन

रशिया-युक्रेन युद्धाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये १७.५ कोटी टन कार्बन डायऑक्साईडसह इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन झाले असावे असा अंदाज आहे. त्यामध्ये पुनर्बांधणीमुळे होणाऱ्या उत्सर्जनाचाही समावेश आहे. पश्चिम आशियामधील युद्धामुळे आणखी किमान ५ कोटी टन हरितगृह वायूंचे उत्सर्जन झाल्याचा अंदाज आहे. या दोन युद्धांमुळे झालेले एकूण उत्सर्जनाची तुलना युक्रेन, इटली किंवा पोलंडच्या वार्षिक उत्सर्जनाबरोबर करता येईल असे हवामान संशोधकांनी सांगितले.

युद्धांमुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये लक्षणीय वाढ होते. केवळ स्फोटांमुळेच नाही तर अतिशय ऊर्जा खर्च करणाऱ्या लष्करी पुरवठा साखळीमुळेसुद्धा ही वाढ होते.- 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply