ATM Card Fraud : फेविक्विक टाकून एटीएममधून काढायचे रक्कम; ग्राहकांची फसवणूक करणारा एकजण ताब्यात

Rahata (Ahilyanagar) : एटीएममधून पैसे काढायला जाताय तर सावधान. कारण मदत करण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अशाच प्रकारे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांना मदत करण्याचा बहाणा करत खात्यातून रक्कम काढत फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. पोलिसांनी तब्बल ६९ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात विविध एटीएममध्ये फ्रॉड करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी दिपक राजेंद्र सोनी हा मुळचा मध्यप्रदेशातील असुन त्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मदत करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचे तपासात समोर आले आहे.

Pune Swargate ST Depot Case : ना ओळख, ना कुठला व्यवहार, पसरत असलेले नरेटीव्ह दत्ता गाडेच्या वकिलाने काढले खोडून

असे काढायचे एटीएममधून रक्कम

एटीएम कार्डच्या स्लॉटमध्ये फेविक्विक टाकून पैसे काढण्याचा प्रकार आरोपीकडून केला जात होता. ग्राहकाने मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकल्यानंतर आजुबाजूला असलेले आरोपी पासवर्ड बघायचे. एटीएम स्लॉटमध्ये टाकलेल्या फेविक्विकमुळे एटीएम कार्ड त्यात अडकताच ग्राहक गोंधळून जायचे. अशा वेळी मदतीचा बहाणा करून आरोपी ग्राहकांना बोलण्यात गुंतवून त्याच कंपनीचे दुसरे एटीएम कार्ड द्यायचे आणि ओरिजनल कार्ड स्वतःकडे ठेवायचे. ग्राहक निघून गेल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड वापरून ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करायचे. किंवा एखादा ग्राहक कार्ड अडकले म्हणून बँकेत तक्रार करण्यासाठी गेला की आरोपी पासवर्ड टाकून पैसे लंपास करायचे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply