Amit Shah : कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले ५ प्रश्न

Amit Shah : लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असून आरोप-प्रत्यारोप फैरी झडत आहेत. यादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेचं आव्हान दिलं होतं. आता अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट पाच प्रश्न केलेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शहा यांनी राहुल गांधींना प्रश्न केलेत. यावेळी अमित शहा यांनी राहुल गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी घेण्यावरूनही भाष्य केलंय. राहुल गांधी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणाहून मैदानात उतरले तरी आपल्याला काही त्रास नसल्याचं शहा यावेळी म्हणालेत.

वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर तेथील जनतेला सांगितलं पाहिजे होतं की, मी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परंतु तुम्ही तेथील निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची वाट पाहिली. तेथील स्थिती चांगली नसल्याचं तुम्हाला जाणवलं त्यानंतर तुम्ही रायबरेलीची निवड केली. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगल नाहीये. त्यांनी वायनाडमधील मतदारांना सांगितलं पाहिजे होतं की,ते वायनाडसह रायबरेलीतून ते निवडणूक लढवणार आहेत, अशी टीका करताना अमित शहा यांनी केलीय.

Swati Maliwal : CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

अमित शहा यांचे राहुल गांधींना ५ प्रश्न

ते तिहेरी तलाक हटवण्याचे समर्थन करतात का, हो की नाही?

ते मुस्लीम पर्सनल लॉ लागू करणार आहेत का?

ते सर्जिकल स्ट्राइकचं समर्थन करतात का?

तुम्ही राम दर्शन करायला का गेले नाहीत?

काश्मिमधील कलम ३७० हटवण्यासंदर्भात तुमचं समर्थन आहे का?

राहुल गांधींचा उद्देश फक्त खोटं बोलणेच आहे का? हे प्रश्न जनतेपुढे मी केलेत त्यामुळे राहुल गांधींना यावर आपली बाजू मांडावी असं अमित शहा म्हणालेत. यावेळी शहा यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. राहुल गांधी देशातील जनतेला खोटं सांगत आहेत. खोटी माहिती देणं हा त्यांचा उद्देश आहे.

मोदी सरकारने दोनवेळा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. तेव्हा संविधानात बदल झाला नाही. आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग आरक्षण मिटवण्याचा केला नाहीये. तर आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी केलाय. कलम ३७० हटवणं, तीन तलाक, आणि सीएए कायदा बनवणं, राम मंदिर बनवणं, चंद्रयानचं लॉन्चिंग आणि १३० कोटी देशवासियांना वाचवण्यासाठी केला. पण राहुल गांधी यासर्व गोष्टींकडे विदेशी चष्मातून बघतात. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही कधीच धर्म आणलं नाही. हे जेव्हा-जेव्हा घडले आहे, तेव्हा ते काँग्रेसने केलंय. आता काँग्रेसला मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply