पुणे : १० वर्षांत १०० कोटी खर्च झाले; आता देखभाल दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने पुणे मनपा २० बायोगॅस प्रकल्प करणार बंद

बायोगॅस प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा तसेच प्रकल्पापर्यंत ओला कचरा वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने वीस बायोगॅस प्रकल्प बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर बायोगॅस प्रकल्प बंद करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे प्रकल्पांवर आत्तापर्यंत केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाणार आहे.

ओल्या कच-यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅसनिर्मितीसाठी महापालिकेने गेल्या दहा वर्षात शंभर कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात २५ बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. त्यांची क्षमता पाच ते दहा टन एवढी आहे. महापालिकेच्या वतीने पहिला प्रकल्प मॉडेल कॉलनी परिसरात सन २००८-०९ मध्ये उभारण्यात आला. यातील बहुतांश प्रकल्पांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यानंतरही या प्रकल्पांसाठी देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिका करत होती. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र आता हा खर्च परवडत नसल्याने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंचवीस पैकी २० प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ओल्या कच-याचे विक्रेंद्रीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी पाच ते दहा टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply