स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले: शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन, ९९ व्या घेतला अखेरचा श्वास

मुंबई : शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ वर्षी निधन झाले आहे. त्यांचे रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. द्वारका आणि शारदा पिठाचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू म्हणून मानले जातात.

स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज हे कोटी हिंदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ आहेत. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराजांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील जबरपूरजवळील दिघोरी गावातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे होते. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला. या दरम्यान ते उत्तर प्रदेशमधील काशी येथे पोहोचले आणि ब्रम्हकालीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग तसेच धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.

स्वातंत्र्यलढ्यातही शंकराचार्यांचे मोलाचे योगदान होते. १९४२ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी 'क्रांतिकारी साधू' म्हणून ते नावारुपाला आले होते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांना इतर क्रांतिकारांप्रमाणेच काशी येथील तुरुंगात ९ महिने तर मध्य प्रदेशातील तुरुंगात ६ महिने अशी शिक्षा भोगावी लागली होती.

स्वरुपानंद सरस्वती यांनी १९५० मध्ये दंड दिक्षा घेतली होती. शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी दंड दिक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले तर १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. १९८२ मध्ये ते गुजरातच्या द्वारकाशारदा पीठ आणि बद्रिनाथच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य बनले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply