पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.
उड्डाणपूल प्रकल्पाचे काम ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी आणि इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगती पथावर आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच मार्गिका आणि सातारा-मुंबई साठी तीन मार्गिका अशा एकूण आठ मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ मार्गिका उपलब्ध आहेत.
बेंगळुरू मुंबई महामार्गावरील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) आणि माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजेकडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. बावधन कडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ६ चे काम प्रगतीत असून दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. कोथरुड- वारजे- सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
मुळशी मुंबई रॅम्पच्या उर्वरित भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ठ प्रकरणात वीस ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महापालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती यावेळी संजय कदम यांनी दिली.
एनडीए सर्कलचे सुशोभीकरण
कोथरुड- एनडीए रस्ता- मुळशी आणि एनडीए – मुंबईच्या दरम्यान असणाऱ्या ‘एनडीए सर्कल’ चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगर पालिका आणि एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेऊन चौकाचे सुशोभीकरण करण्याविषयी सूचना केली. त्यानुसार दिशा कन्सल्टंट यांच्याकडून बनवण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीएकडून नुकतीच सहमती मिळालेली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
शहर
- Mumbai News : मंत्रालयाची सुरक्षेत वाढ, चेहरा दाखवूनच मिळणार प्रवेश; काय आहे एफआरएस तंत्रज्ञान?
- Mumbai Crime : मुंबई हादरली! एक्सप्रेस ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार
- Crime News: गुन्हा केला एकाने मार खाल्ला दुसऱ्यांनी, बांगलादेशी समजून ४ मित्रांना भिवंडीत बेदम मारहाण
- Pune : MPSC पेपर विक्री प्रकरणात मध्य प्रदेश कनेक्शन उघड, पोलिसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या
महाराष्ट्र
- Crime News : त्यानं ब्लॅकमेल केलं, शारीरिक संबंध ठेवताना तिनं शेजाऱ्याचा गळा आवळला
- Pen Ashram School : पेण आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापक, अधीक्षकास नोटीस
- Mumbai News : मंत्रालयाची सुरक्षेत वाढ, चेहरा दाखवूनच मिळणार प्रवेश; काय आहे एफआरएस तंत्रज्ञान?
- Manoj Jarange Patil : आमची माणसं मरतायेत, तुम्ही मजा बघताय का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांवर संतापले
गुन्हा
- Pune Crime : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून
- Kolkata : कोलकातामधील 'निर्भया'ला १६१ दिवसांनी मिळाला न्याय; आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Baramati : निर्दयी बाप! अभ्यास करत नाही म्हणून केली ९ वर्षाच्या लेकाची हत्या, बारामतीमधील धक्कादायक घटना
- Pune Crime : आधी मुलाला मारलं नंतर पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं पिंपरी-चिंचवड हादरलं!
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Union Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प समजून घ्या महाराष्ट्राचे CM फडणवीस आणि DCM शिंदे यांच्या नजरेतून; वाचा काय म्हणाले...
- Nirmala Sitharaman Budget Saree : निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं लक्ष, पांढऱ्या सोनेरी बॉर्डरच्या साडीचं आहे बिहार कनेक्शन
- Mahakumbh Fire : चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
- Mahakukbh Mela Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव