सोलापूर : 'सबका साथ सबका विकास', 'भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र' अशा घोषणा करूनही तत्कालीन फडणवीस सरकारलाही त्यांच्याच खात्यातील लाचेची प्रकरणे रोखता आली नाहीत. आता महाविकास आघाडी सरकारमध्येही लाच घेण्याचा सिलसिला सुरुच असून मागील अडीच वर्षांत (22 मार्चपर्यंत) 812 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तोच धागा पकडून विरोधकांनी गृह विभागाला लक्ष केले आहे.
पोलिस (गृह) विभागापेक्षाही महसूल विभागातील लाच प्रकरणांची संख्या सर्वाधिक असतानाही विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडील गृह विभागालाच टार्गेट केले आहे. सचिन वाझेच्या प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विरोधकांनी गृह विभागाला लक्ष करायला सुरवात केली. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये पोलिस दलातील लाच घेणाऱ्यांची संख्या वाढली. 2020 मध्ये 218 तर 2021 मध्ये 255 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. जानेवारी ते 21 मार्च 2022 या काळात 39 पोलिस अधिकारी व कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. तत्पूर्वी, तत्कालीन सरकारच्या काळातही तेवढेच प्रमाण होते.
तरीही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करीत विरोधकांनी त्याचे भांडवल करायला सुरवात केली आहे. हे महाविकास नव्हे तर वसुली सरकार असल्याची टीकादेखील विरोधकांनी केली. पण, अधिकारी, अंमलदार होण्यापूर्वी सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, म्हणणारेच आता लाचखोर निघू लागल्याने विरोधकांना आक्रमकतेची संधी मिळत आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्थेशी निगडीत हा विभाग लाच प्रकरणांमुळे बदनाम झाला आहे. ही बदनामी रोखून विरोधकांना टिका करण्याची संधी मिळू नये म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
महाराष्ट्र
- पालघर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 'ब्रेकथ्रू'तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम पूर्ण; कामाला वेग!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




